शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (09:00 IST)

भररस्त्यात महिलेला प्रसव वेदना, मुंबई पोलिसांनी करविली सुखरूप प्रसूती

baby legs
मुंबई पोलिसांच्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मुंबई डोंगरी पोलिसांच्या निर्भया पथकाने प्रसूती वेदना असलेल्या महिलेची रस्त्यावरच प्रसूती केली. गस्ती पथकानेही आई आणि मुलांना रुग्णालयात नेले.

दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत. मुंबईच्या डोंगरी पोलिस स्टेशनच्या निर्भया पथकाला गस्त घालताना एक 45 वर्षीय महिलेलेला भर पावसात अर्धवट प्रसूती अवस्थेत आढळली तिला भर रस्त्यात प्रसव वेदना सुरु झाल्या.हे पाहून निर्भया पोलीस पथकाने ताडपत्री गोळा करून महिलेची सुखरूप प्रसूती करवण्यास मदत केली आणि बाळ आणि आईला रुग्णालयात दाखल केले. आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती महिलेच्या कुटुंबियांना पोलिसांनी दिली. पोलिसांच्या या कामाचे कौतुक करत आहे. 
 
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास परिसरात गस्त घालत असताना, निर्भया पथकाला कळले की डोंगरी येथील चार नल जंक्शन येथे एका महिलेला प्रसूती वेदना होत असून रक्तस्त्राव होत आहे. यानंतर पथकात समाविष्ट असलेल्या महिला पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली.

महिलेला रक्तस्त्राव होत असल्याने आणि रुग्णवाहिका यायला थोडा वेळ लागण्याची शक्यता असल्याने, त्यांनी महिलेला झाकण्यासाठी पोस्टर आणि ताडपत्र गोळा केले आणि आडोसा लावून महिलेची प्रसूती केली. पोलीस कर्मचाऱ्यांनी पूर्ण खबरदारी घेत महिला व तिच्या नवजात बालकाला पेट्रोलिंग व्हॅनमधून उपचारासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात नेले. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी निर्भया पथकाचे अभिनंदन करताना ही माहिती दिली.
Edited By - Priya Dixit