Last Modified: पुणे , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:59 IST)
पुण्यात 47 बस जाळल्या
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक होण्यापूर्वी सुरू झालेल्या हिंसाचारात काल पुणे होरपळून निघाले.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात जवळपास 47 बसची तोडफोड करून त्यापैकी काही बसमध्ये आग लावल्याचे वृत्त आहे. एवढ्यावरच न थांबता काही जणांनी पुण्यात दुकानांनाही पेटवून दिले. आज पुण्यात तणावपूर्ण शांतात असून मंगळवारी झालेली हिंसा पाहता शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अनिल कुंभार यांनी दिली आहे.