महाराष्ट्रात केंद्राने हस्तक्षेप करावा- अर्जुनसिंह
महाराष्ट्रात सूरू असलेली हिंसा थांबविण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रात हस्तक्षेप करावा अशी मागणी मुनुष्यबळ विकासमंत्री अर्जुन सिंह यांनी केली आहे.महाराष्ट्र आणि केंद्रात दोन्हीकडे कॉंग्रेसचेच सरकार सत्तेवर आहे. असे असताना महाराष्ट्रात निर्माण झालेली स्थिती भयावह असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनसे नेते राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयां विरोधात केलेले वक्तव्य र्दुदैवी असल्याचे ते म्हणाले.