Last Modified: मुंबई , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:52 IST)
मुंबईत तणावपूर्ण शांतता
मनसे नेते राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिस कारवाईच्या शक्यतेने मुंबईकरांची मंगळवारची पहाट तणावपूर्ण शांततेत झाली.
गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि सपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामार्या होत असल्याने मुंबईतील चाकरमान्यांचा जीव आधीच टांगणीला लागला आहे.यातूनच कृष्णकुंजवर पोलिस ताफा दाखल झाल्याचे वृत्त पसरताच मनसेचे कार्यकर्तेही राज यांच्या घराबाहेर जमल्याचे समजते. राज यांना अटक केल्यानंतर निर्माण होणार्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसबल वाढवले जाण्याची शक्यता आहे.