Last Modified: मुंबई , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:54 IST)
कुटुंबीयांकडून राजच्या भूमिकेचे समर्थन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांविरूद्धच्या आघाडीचे ठाकरे कुटुंबीयांनी समर्थन केले असून ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
राज मराठी माणसाच्या हितासाठी संघर्ष करत असून या मुद्द्यावर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याचा निर्धार राजच्या सासूबाई पद्मा वाघ यांनी बोलून दाखवला. मात्र राजचा मुलगा अमित याच्याबाबत त्यांनी काळजी व्यक्त केली. अमित यंदा बोर्डाच्या परीक्षेस बसणार आहे. राजचे सासरे मोहन वाघ हे सुप्रसिद्ध नाट्यनिर्माते आहे.