Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:20 IST)
ठाकरेंवर मोक्का लावा- प्रभूनाथ सिंह
राज ठाकरे यांच्या नंतर आता त्यांचे काका मराठीचे राजकारण करत असल्याचा आरोप करत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) लावण्याची मागणी राष्ट्रीय जनता दलाचे खासदार प्रभूनाथ सिंह यांनी केली आहे.
सिंह यांनीच मुंबईतील उत्तर भारतीयांविरोधात झालेल्या हिंसेचा मुद्दा संसदेत मांडला होता. यानंतर सामन्यातील लेखाविषयी त्यांनी आपली प्रतिक्रिया राजधानीत दिली असून, बाळासाहेब चर्चेत येण्यासाठी नेहमीच अशी वक्तव्ये करत असतात, त्यांना मोक्का लावण्यात यावा असे सिंह म्हणाले.