Last Modified: मुंबई , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:56 IST)
प्रांतीयवादाच्या लढ्यात शिवसेनाही आखाड्यात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परप्रांतीयांविरोधात आंदोलन छेडल्यानंतर शिवसेनेसही स्फुरणं चढले असून 'कर सहाय्यक' पदाच्या निवडीत स्थानिकांना डावलल्याच्या निषेधार्थ आयकर कार्यालयासमोर 'जय महाराष्ट्र'ची घोषणा बुलंद केली आहे.
याप्रकरणी शिवसेनेच्या तीस कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. सेनेने निवडीत सुमारे तीनशे सत्तर परप्रांतीयांची वर्णी लागल्याचा आरोप करून स्थानिकांना डावलल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.