Last Modified: इंदूर , शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:19 IST)
मुंबई दंगलीला शरद पवारच जबाबदार-अमरसिंह
विशेष प्रतिनिधी
राज ठाकरे यांच्यावर आरोप करत महाराष्ट्रात राजकीय नाट्य घडवून आणल्यानंतर समाजवादी पक्षाने आपला मोर्चा केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे वळवला आहे.
पक्षाचे नेते अमरसिंह यांनी मुंबई दंगलीचे खापर शरद पवार यांच्यावर फोडले असून शरद पवार हेच मुंबई दंगलीला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केल्याने आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयां विरोधात हल्ले केल्याचा गंभीर आरोपही अमरसिंह यांनी केला आहे.इतक्यावरच न थांबता शरद पवार यांच्या जावयावरही ते घसरले असून, त्यांनीच या सार्याचे नियोजन केल्याचेही ते म्हणाले.
आगामी काळात होणार्या निवडणुकांना डोळ्यापुढे ठेवून मुंबईत उत्तरभारतीयां विरोधात द्वेष पसरवण्यात आला. राज ठाकरे हे अभिषेक बच्चन यांचे चांगले मित्र असून,त्यांच्यात कोणतेही मतभेत नाहीत. केवळ शिवसेनेची मतं पळवण्यासाठी राज यांचा शरद पवार यांनी वापर केल्याचे ते म्हणाले.