अमरनाथ यात्रे दरम्यान भाविकांना नाही मिळणार तळलेले भोजन आणि शीतल पेय
दक्षिण काश्मीर स्थित पवित्र अमरनाथ गुफा मंदिर दर्शन यात्रे दरम्यान मागच्या वर्षी आजारपणामुळे भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता या घटनेमुळे यंदा यात्रे दरम्यान भाविकांना तळलेले भोजन, फास्ट फूड आणि शीतल पेय देण्यात येणार नाही. अमरनाथ यात्रा 2 जुलै पासून सुरू होत आहे.
श्री अमरनाथ श्राइन बोर्ड (एसएएसबी)चे प्रवक्ते यांनी सांगितले की विशेषज्ञांच्या समितीने यात्रे दरम्यान भाविकांना तळलेले भोजन, फास्ट फूड आणि शीतल पेय देण्यात मना केले आहे.
यात्रे दरम्यान संपूर्ण रस्त्यावर भाविकांसाठी लंगरामध्ये मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.