1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: मुझफ्फरनगर , शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (11:27 IST)

उत्तर प्रदेशात विवाहितेवर गॅंगरेप

मुझफ्फरनगरमधील घाशीपूर या गावात 20 वर्षांच्या विवाहितेवर सामूहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे विवाहितेवर तिच्या पतीसह अन्य तिघांनी सामूहिक बलात्कार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दहा एप्रिल रोजी पीडिता घरी एकटी होती. तिचा पती त्याचा तीन मित्रांना घरी घेवून आला आणि चौघांनी मिळून तिच्यावर आळ‍ीपाळीने बलात्कार केला. असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलिसांनी पीडितेच्या पतीला अटक केली असून, त्यांच्या फरारी मित्रांचा पोलिस शोध घेत आहेत.