1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , शनिवार, 5 सप्टेंबर 2015 (11:10 IST)

खोडकर मुखर्जीं गुरुजींनी घेतला क्लास

‘मी अतिशय खोडकर होतो. अंधाराला खूपच घाबरायचो, अशा बालपणीतील आठवणी ‘शेअर’ करीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा ‘क्लास’ घेतला.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुखर्जी यांनी दिल्लीच्या प्रेसिडेन्शियल इस्टेटस्थित डॉ. राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आपल्या विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा देताना मुखर्जी यांनी हा संवाद साधला. ते म्हणाले, मी अतिशय खोडकर होतो. आई माझ्यामुळे अगदी वैतागायची. खोड्यांमुळे मला मारही बसायचा. दरम्यान, ‘भारताचा स्वातंत्र्यसंग्राम आणि राजकारण’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.