1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

चीनच्या भूमिकेवर भारत नाराज

अणू पुरवठादार देशांच्या अर्थात एनसजी बैठकीत भारत-अमेरिका अणुकराराला चीनने आपला विरोध दर्शवत भारता विरोधात मत व्यक्त केल्याने भारताने नाराजी व्यक्त केली आहे.

या देशांना आपले मत व्यक्त करण्याची मुभा असली तरी चीन सारख्या शेजाऱ्याने असे करणे चुकीचे असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी चीनच्या या नकारात्मक भूमिकेविषयी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली. चीनचा हा अंतर्गत प्रश्न असला तरी, भारताचा शेजारी असल्याने चीनने या बैठकीत भारताला पाठिंबा देणे अपेक्षीत असल्याचे प्रणव यांच्या बोलण्यातून जाणवत होते.