1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 21 एप्रिल 2014 (17:38 IST)

तरुण तेजपालचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला

आपल्या सहकारी महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी  'तेहलका' मासिकाचे संस्थापक संपादक  तरुण तेजपाल यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानेही आज (सोमवारी) फेटाळून लावला. हायकोर्टानेही यापूर्वी तेजपाल यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तेजपाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टात तेजपाल यांना जबरदस्त झटका दिला आहे.

तेजपाल यांच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात पाचशे पानी जामीन अर्ज सादर करण्‍यात आला होता. कोर्टाने तो फेटाळला असून गोवा पोलिसांना येत्या चार आठवड्यात  अहवाल सादर करण्‍याचे आदेश दिले आहेत.