शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 24 मे 2016 (16:39 IST)

दिल्लीत एअर एम्बुलेंस अपघात, सातही प्रवासी सुखरुप

पटनाहून दिल्लीत येत असलेली एक एअर ऍम्ब्युलन्स सी-390चा  नजाफगड मध्ये अपघात झाला. ऍम्ब्युलन्समध्ये 7 प्रवासी होते.  
 
या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलछेमिस्ट एअरलाइन्स कंपनीचे एअर ऍम्ब्युलन्स पाटणावरून दिल्लीकडे जात होते. नजाफगड भागात आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एअर ऍम्ब्युलन्सला अपघात झाला. यावेळी ऍम्ब्युलन्समध्ये सात प्रवासी होते. अपघातात पाच जण जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी आग्निशामक दलाचे जवान दाखल झाले आहेत. एअर ऍम्ब्युलन्सच्या वैमानिकाच्या सजकतेमुळे ७ प्रवाशांचे जीव वाचले आहेत. याबाबत पुढील तपास सुरू आहे.