शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नीट: राष्ट्रपतींचा विद्यार्थ्यांना दिलासा

नवी दिल्ली- वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेचा निकाल लावण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकूमावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालांमधील प्रवेश यंदाच्या वर्षी राज्याच्या ‘सीईटी’नुसारच होणार आहेत. या वटहुकूमामुळे हजारो विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासगी वैद्यकीय कॉलेजांतील सरकारी कोटय़ातील जागा राज्यांच्या ‘सीईटी’मार्फत भरल्या जाणार असून इतर जागा आणि अभिमत विद्यापीठांतील प्रवेश मात्र ‘नीट’मार्फतच होणार आहेत.
 
सर्वोच्च न्यायालाचा ‘नीट’वरील आदेश अंशत: खोडून काढण्यासाठी मोदी सरकारने शुक्रवारी वटहुकूम जारी केला होता. त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी व्हायची होती. या अध्यादेशाबाबत ते खूप सावध होते. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालाने रद्दबातल ठरविला होता. त्यामुळे ‘नीट’बाबतच्या वटहुकूमाची नीट माहिती घेतल्याशिवाय, समाधान झाल्याशिवाय स्वाक्षरी न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता.
 
* सर्व अभिमत विद्यापीठे आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालातील प्रवेश ‘नीट’नुसारच होणार
 
* निवडक राज्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालातील प्रवेश राज्यांच्या प्रवेश परीक्षेनुसार (सीईटी) होणार
 
* खासगी वैद्यकीय महाविद्यालातील शासकीय कोटय़ातील प्रवेशही ‘नीट’ किंवा ‘सीईटी’नुसार करण्याची मुभा
 
* खासगी वैद्यकीय महाविद्यालातील मॅनेजमेंट कोटय़ातील प्रवेशही ‘नीट’नुसारच होणार
 
* राष्ट्री लोकशाही आघाडीने ‘नीट’प्रकरणी काढलेला अधदेश हा गेल दोन वर्षातील 21वा आहे.