पंजाबमध्ये नर्सवर सामुहिक बलात्कार
दिल्लीत सफदरजंग रुग्णालयातील एका नर्सवर पंजाबमधील बुढलाडा येथे गॅंगरेप करण्यात आल्याची घटना घडली आहे. दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी रात्री 'निर्भया'वर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. निर्भयाला सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान पीडितेनेच निर्भयाची देखरेख केली होती. परंतु निर्भयाचा सिंगापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला होता.
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. वैद्यकीय तपाणीसाठी पीडितेला मानसा येथील रुग्णालयात आणले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी बुढलाडा येथील रमनदीप कौर नामक एक महिला पीडितेला भेटली होती. तिच्या नवर्यासह त्याच्या साथीदार्यांनी पीडितेला धोक्याने पंजाबमध्ये बोलावून तिच्यावर एका शेतातील ट्यूबवेलच्या खोलीत सामूहिक बलात्कार केला. बलविंदर सिंह उर्फ राजबीरशी असे प्रमुख आरोपीचे नाव असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.