1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पणजी , शनिवार, 8 नोव्हेंबर 2014 (16:27 IST)

पर्रिकरांचा राजीनामा; लक्ष्मीकांत पार्सेकर होणार गोव्याचे मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी शनिवारी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे नवे मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत पार्सेकर यांच्या नावावर एकमत झाले. आज सायंकाळी पार्सेकर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
 
संघाचे स्वयंसेवक असलेल्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील संसदीय बोर्डाने पसंती दिल्याचे समजते. 
 
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मनोहर पर्रिकर हे रविवारी दुपारी एक वाजता संरक्षणमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पर्रिकर यांनी शन‍िवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला. 
 
दरम्यान, आपण ज्युनियरच्या हाताखाली काम करणार नाही असे म्हणत राजीनामा देऊन बंडाची भाषा करणारे फ्रान्सिस डिसुझा यांनी यू-टर्न घेतला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी घेईन तसेच पक्ष ज्याची नेतेपदी निवड करील ते मान्य असेल असे डिसुझा यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.