1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :अमृतसर , सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 (11:48 IST)

पाकिस्तानातील दोन घुसखोरांना ठेचले

पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नातील दोघांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ठेचून काढत त्यांच्याकडून दहा किलो हेरॉइन जप्त केले. पंजाबमधील भारत- पाकिस्तान सीमेवर ही कारवाई करण्यात आली.
फिरोजपूर विभागातील मेहंदपूर सीमेवर आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बीएसएफह्यच्या जवानांना काही लोक संशयास्पद हालचाली करीत असल्याचे आढळून आले. या चौघांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. या वेळी जवानांनीही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हे चौघे ठार झाले.

घटनास्थळावरून जवानांनी दहा किलो हेरॉइनसह एक मोटारसायकल आणि दोन पिस्तूल जप्त केल्या आहेत.