रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

फेसबुकवर चॅट केल्याची शिक्षा, पत्नीचे तुकडे करून लावली आग

हैदराबाद- फेसबुकवर चॅट करणे सामान्य बाब असली तरी हैदराबादच्या एका पतीने यासाठी आपल्या पत्नीला अशी शिक्षा दिली की ऐकून धक्का बसेल. येथील एका व्यक्तीने आपल्या कांगो मूळच्या 30 वर्षाच्या पत्नीचा खून केला आणि नंतर देहाचे तुकडे करून जाळले.
 
36 वर्षीय आरोपी रूपेश कुमार मोहनानी याला पोलिसाने अटक केली आहे. एका खाजगी कंपनीत नोकरी करणारा रूपेश गचीबोवली मध्ये राहत होता. त्याने 2008 मध्ये कांगो मूळची क्लब डांसर सिंथिया वेचेल हिच्यासह लग्न केलं होतं. त्याला एक मुलगीदेखील आहे.
 
सूत्रांप्रमाणे दोघांमध्ये पेश्यामुळे वाद होत असे. सिंथिया फेसबुकवर आपल्या फ़्रेंड्सशी चॅट करायची. यामुळे रूपेशला तिच्या चरित्रावर शंका व्हायची. तीन जुलै रोजी अश्याच काही कारणामुळे दोघांमध्ये भांडणं झाले आणि रागात त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला.
 
खुनाचे पुरावे मिटविण्यासाठी त्याने चाकू आणि कुर्‍हाडाने मृतदेहाचे लहान-लहान तुकडे केले आणि घरापासून लांब जाऊन ते जाळले. काही गावकर्‍यांनी त्याचे हे कृत्य बघून त्याला धरले.