1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: अहमदाबाद , गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (11:13 IST)

भारत-चीनदरम्यान तीन करारावर स्वाक्षर्‍या

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अहमदाबाद भेटीदरम्यान दोन्ही देशामध्ये तीन करारावर बुधवारी सह्या झाल्या. दोन्ही देशादरम्यान व्यापारी व गुंतवणूक वाढविणे, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रामधील देवाण-घेवाण आणि वैद्यकीय ज्ञानाचे आदान प्रदान करण्याला या तीन करारामुळे चालना मिळेल अशी अपेक्षा जिनपिंग व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. दोन्ही देशादरमनचा सीमा तंटा लवकर सोडविण्यावर भर देण्याचा मनोद दोन्ही देशाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
 
जिनपिंग यांचे आपली पत्नी पेंग लिआन यच्यासह अहमदाबाद विमानतळावर आगमन झाले तेव्हा गुजरातचे राज्यपाल ओ.पी. कोहली आणि मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी स्वागत केले. याप्रसंगी पाहुण्यांच्या स्वागतांनी गुजराती गरबा नृत्य सादर केले. हयात हॉटेलमध्ये  जिनपिंग व त्यांच्या पत्नी पेंग यांचे आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. गौतम बुध्दांच्या छाचित्रांचे प्रदर्शन दाखविले. त्यानंतर दोन्ही नेत्यांची करारावर सह्या करण्यापूर्वी चर्चा केली. भारतातील रेल्वे, उत्पादन क्षेत्र आणि मूलाधारविषयक सुविधा यामध्ये चीन मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करण्याचे निवेदन जिनपिंग यांनी केले. त्याचे मोदी यांनी स्वागत केले आहे.