रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By नई दुनिया|
Last Modified: जम्मू , बुधवार, 9 सप्टेंबर 2009 (08:55 IST)

भारत-चीन सीमेवर सैन्याची जमवाजमव

मागील काही दिवसांपासून चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी सुरू केल्याने उभय देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. भारताने लेह लडाख भागातील सीमेवर अतिरिक्त सैनिक तुकडी तैनात करत या भागात मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्यांसह रणगाडेही पाठवल्याने चीननेही सीमेवर जमवाजमव सुरू केली आहे.

चिनी सैनिकांनी लेह भागात भारतीय हद्दीत प्रवेश करत येथील दगडांवर लाल अक्षरात चीन लिहिल्याने तणाव आणखी वाढला आहे. भारताने या भागात टी-72 रणगाडे तैनात केले आहेत.

पैगांग येथे मोठ्या प्रमाणावर सैन्य तुकड्या दिसत असून, चिनी युद्ध हेलीकॉप्टर या भागात तैनात करण्यात आले आहेत.