1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (12:05 IST)

मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता

पूर्व-मध्य अरबी समुद्रातील ठळक कमी दाब क्षेत्राचे शुक्रवारी सकाळी तीव्र कमी दाब क्षेत्रात (डिप्रेशन) रूपांतर झाले आहे. गोव्यापासून ४१० किलोमीटर तर मुंबई पासून ६३० किलोमीटर अंतरावर नैऋत्य दिशेला असलेली प्रणाली काही काळ उत्तरेकडे सरकुन नंतर वायव्य दिशेकडे जाण्याचे संकेत आहे. शनिवारी सकाळपर्यंत त्याचे अति तीव्र कमी दाब क्षेत्रात (डीप डिप्रेशन) रूपांतर होणार असून, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्यास पोषक स्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.