शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By नई दुनिया|

'माजी खासदार सुब्बा भारतीय नागरिक नाहीत'

कॉग्रेसचे माजी खासदार एम के सुब्बा हे भारतीय नागरिक नसल्याचा खुलासा सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. सुब्बा नेपाळमधील असून, त्यांना हत्येच्या प्रकरणात नेपाळमध्ये शिक्षा झाली आहे.

विरेंद्रनाथ सिंह यांनी सुब्बा यांच्या विरोधात एक याचिका न्यायालयात दाखल केली आहे. सुब्बा हे मूळ नेपाळी नागरिक असून, त्यांना हत्या प्रकरणात नेपाळमध्ये शिक्षा झाली आहे. ते नेपाळच्या तुरुंगातून पळून आले असून, त्यांनी भारतात आपली ओळख लपवल्याचे या याचिकेत म्हटले आहे.

न्यायालयाने या प्रकरणी सुब्बा यांच्या गुन्हा नोंदवण्याचे आदेश सीबीआयला देण्यास नकार दिला असला तरी सिंह या प्रकरणी सुब्बा यांच्या विरोधात सीबीआयकडे एफआयआर नोंदवू शकतात असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.