1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016 (13:47 IST)

रावी नदीत संशयास्पद बोट सैन्याच्या वेगवान हालचाली

भारतातील पंजाबमध्ये सकाळी रावी नदीच्या पात्रात एक बेवारस संशयास्पद बोट सापडली आहे.  यावर लगेच खबरदारी घेत  सीमा सुरक्षा दलाकडून (बीएसएफ) ही नाव ताब्यात घेण्यात आली आहे. तर झालेला हल्ला आणि आतंकवादी भारतात आले असल्याच्या दाट संशय यामुळे   संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. रावी नदीत टोटा गुरू पोस्टजवळ ही बोट दृष्टीस पडली. या बोटीवर पाकिस्तानी खुणाही आढळून दिल्या आहेत.  सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर सीमेवर घुसखोरी आणि दहशतवादी हल्ल्यांची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरूदासपूर येथील डेरा बाबा नानक परिसरात काहीवेळापूर्वीच पंजाब पोलिसांना संशयास्पद हालचाली दिसून आल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांकडूनही शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. तर पुनः हल्ला होऊ शकतो यामुळे भारतीय सैन्य सुरु असून भारत पुन्हा एखादी लष्करी मोहीम करणार आहे असे पाकिस्थान कांगावा करत आहे.