1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 23 जुलै 2014 (11:37 IST)

राष्ट्रपतींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी लढणार निवडणूक

देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी दिल्लीत आगामी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या रुपात कॉंग्रेसला नवीन चेहरा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शर्मिष्ठा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली प्रदेश कॉंग्रेसचे सभासदत्व स्वीकारले. शर्मिष्ठाला ग्रेटर कैलाश भागातून निवडणूकीसाठी उमेदवारी दिली जाण्याचा शक्यता आहे.

एक इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना शर्मिष्ठा यांनी निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रीया दिली आहे. याबाबत पक्ष जो निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल असेही शर्मिष्ठा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सेंट स्टीफन महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या शर्मिष्ठा कथ्थक नृत्यात पारंगत आहेत. त्यांचे भाऊ अभिजीत पूर्वीपासूनच पश्चिम बंगालच्या जंगीपूरा येथील खासदार आहेत.