रेड्डीपुत्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी जनभावनेचा जोर
आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे पुत्र वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी जनतेने जोरदार मागणी सुरू केली असून रेड्डी समर्थकांनीही त्यासाठी अभियान सुरू केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे आंध्र प्रदेश प्रभारी वीरप्पा मोइली यांनी पक्ष जनभावनांचा स्वीकार करेल असे जाहीर केले आहे.या संदर्भात कॉंग्रेस हायकमांडने घाईघाईत निर्णय न घेण्याचा पवित्रा घेतला असून सात दिवसांच्या दुःखानंतरही कार्यवाह मुख्यमंत्री के. रोसैया यांना पदावर कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.