1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जुलै 2015 (09:59 IST)

व्यापमं घोटाळा: निष्पक्ष चौकशीसाठी चौहान यांना हाकला- कांग्रेस

नवी दिल्ली/भोपाळ- व्यापमं घोटाळ्याबाबत काँग्रेसने अधिक धारदार हल्ला करीत निष्पक्ष चौकशीसाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. व्यापमं घोटाळ्याशी संबंधित असणार्‍या 45 व्यक्तींच्या मृत्यूची जबाबदारी चौहान नाकारू शकत नाहीत, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
 
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सार्‍या प्रकरणाबाबत खुलासा करावा व नैतिक जबाबदारी स्वीकारावी. माजी केंद्री मंत्री पी. चिदम्बरम यांनी व्यापमं घोटाळा घोटाळत आणखी एखाद्याचा अनैसर्गिक मृत्यू ओढवण्यापूर्वी मध्य प्रदेश सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस करण्याची मागणी केली. काँग्रेसचे प्रवक्ते पी. सी. चाको म्हणाले, मुख्यमंत्री चौहान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापमं घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारावी. चौहान यांच्याशी घनिष्ठ संबंध असणार्‍यांविरुध्द अतिशय गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजसिंह यांनी सागर येथील सरोवरात आत्महत्या करणार्‍या प्रशिक्षणार्थी सबइन्स्पेक्टर अनामिकाचा मृत्यूही या घोटाळ्याशीच संबंधित असल्याचा दावा ट्विटरवर केला.