1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (09:56 IST)

हिंदू आणि मुस्लिमांनी गरिबीशी लढावे: मोदी

नवी दिल्ली- दादरी हत्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले आहे. देशातील जातीयवादाशी लढा देण्यासाठी देशवासीयांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन मोदी यांनी केले. 
 
देशाची एकजूट काम राहिली पाहिजे, असे सांगून मोदी म्हणाले की, हिंदू आणि मुस्लिमांनी गरिबीशी एकजूटीने लढा दिला पाहिजे. जाती सलोखा आणि बंधुत्वाची भावना देशाचा विकास करू शकेल, असेही मोदी म्हणाले. देशवासीयांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सल्ल्याप्रमाणे विविधता आणि सहनशीलतेबाबतची मूलभूत तत्त्वे विसरता कामा नयेत. राष्ट्रपतींनी आपल्याला दिशा दाखविली आहे आणि आता आपण याच मार्गावर वाटचाल केली पाहिजे आणि तसे केले तरच जगाकडून व्यक्त होणार्‍या अपेक्षांना आपण न्याय देऊ शकू, असेही मोदी म्हणाले. 
 
दादरी प्रकरणाचा लाभ उठवून राजकीय पोळी भाजून घेणार्‍या शक्तींवर हल्ला चढविताना मोदी म्हणाले की, सध्यातरी मी जनतेला एवढेच सांगू शकतो की, राजकारण आणि राजकीय लाभापोटी देशातील नेते बेजबाबदार विधाने करीत आहेत. नागरिकांनी ही विधाने गांर्भीयाने घेऊ नेत.