रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (10:21 IST)

भंगाराच्या गोदामाला भीषण आग, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील भोईगुडा येथे एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली, त्यात 11 मजूर जिवंत होरपळून मृत्युमुखी झाले. मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर हे बिहारचे रहिवासी असून ते येथील भंगाराच्या गोदामात काम करायचे. 
 
घटनास्थळी उपस्थित असलेले हैदराबाद डीसीपी सेंट्रल झोन यांनी सांगितले की, सर्व 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंगार गोदामाच्या पहिल्या मजल्यावर 12 मजूर झोपले होते. अचानक तळमजल्यावर आग लागली. तळमजल्यावरील भंगारच्या दुकानातून कामगारांना बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग होता ज्याचे शटर बंद होते. आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर एका मजुराला पळून जाण्यात यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन नियंत्रण कक्षाला पहाटे 3 च्या सुमारास अलर्ट मिळाला आणि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या नऊ गाड्यांनी तीन तासांहून अधिक वेळ प्रयत्न केला.
 
गोदामात ठेवलेल्या फायबरच्या केबल्स जाळल्या या मुळे धुराचे लोट पसरले आणि आगीची तीव्रता आणखी वाढली. गोदामात दारूच्या रिकाम्या बाटल्या, कागद, प्लॅस्टिक व इतर केबल्स ठेवण्यात आल्या होत्या. पहिल्या मजल्यावर दोन खोल्या होत्या आणि एका खोलीतून सर्व 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले. एकमेकांच्या वर पडलेले होते. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.