हरियाणा ते बिहारकडे जाणाऱ्या बसचा अयोध्यामध्ये झालेल्या अपघातात 18 ठार

accident
Last Modified बुधवार, 28 जुलै 2021 (09:32 IST)
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील रामस्नेहीघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत लखनौ-अयोध्या राष्ट्रीय महामार्गावर एका डबल डेकर बसला मागून वेगाने येणाऱ्या अनियंत्रित ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला, तर 19 लोक जखमी झाले. सर्व जखमींना लखनौ ट्रॉमा सेंटर येथे हलविण्यात आले आहे. मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. बस हरियाणाहून बिहारकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे
बाराबंकी येथील अयोध्या सीमेवरील कल्याणी नदी पुलावरील डबल डेकर बस रात्री एक च्या सुमारास एक्सल तुटल्या मुळे बंद पडली. मुसळधार पावसामुळे चालक व ऑपरेटर बस बाजूला लावून बस दुरुस्त करत होते.दरम्यान, वेगाने लखनौच्या दिशेने जाणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने बसला धडक दिली. ही टक्कर इतकी जोरदार होती की त्यातील बहुतेक जागीच ठार झाले.

लखनौ झोनचे एडीजी सत्य नारायण सबत यांनी सांगितले की, बाराबंकीतील राम स्नेही घाटजवळ काल रात्री उशिरा एका ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे तर 19 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसखाली अडकलेल्या मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
रात्री 3 :30 पर्यंत चार जणांचे मृतदेह घटनास्थळी अडकले होते, तर 11 जणांच्या मृत्यूची पुष्टी सीएससी रामस्नेही घाट यांनी दिली. तर बाराबंकी जिल्हा रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला.एकूण 18 बस प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सुरेश यादव,इंदल महतो,सिकंदर मुखिया,मोनू सहनी,जगदीश सहनी,जय बहादुर साहनी, बैजनाथ राम, बलराम अशी अद्याप ओळख पटली आहे.अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर पाच किलोमीटर लांब जाम होते. मुसळधार पावसामुळे पोलिसांनाही सुमारे अर्ध्या तासानंतर घटनेची माहिती मिळाली.


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

लस लावताना तुटली सुई, तरुणाचा उजवा हात आणि एक पाय काम करत ...

लस लावताना तुटली सुई, तरुणाचा उजवा हात आणि एक पाय काम करत नाही
उत्तर प्रदेशातील ललितपूरमध्ये आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा दिसून आला. येथे एका ...

पंजाबच्या 17 व्या मुख्यंमत्रीपदावर चरणजितसिंह चन्नी यांची ...

पंजाबच्या 17 व्या मुख्यंमत्रीपदावर चरणजितसिंह चन्नी यांची निवड,शपथविधी सोहळा पार पडला
पंजाब मध्ये काँग्रेचे ज्येष्ठ नेते चरणजित सिंह चन्नी यांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ ...

चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री, हरिश रावत यांची ...

चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री, हरिश रावत यांची माहिती
चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.काँग्रेस हायकमांडने चरणजीत सिंग ...

बिहार: पाटण्यात जिम ट्रेनरवर जीवघेणा हल्ला, डॉक्टर आणि ...

बिहार: पाटण्यात जिम ट्रेनरवर जीवघेणा हल्ला, डॉक्टर आणि पत्नीविरोधात एफआयआर दाखल
बिहारची राजधानी पाटणामध्ये एक हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. शहरातील जिम ट्रेनरच्या ...

काय सांगता ,शासकीय रुग्णालयात मांत्रिकाकडून उपचार

काय सांगता ,शासकीय रुग्णालयात मांत्रिकाकडून उपचार
सुपौल येथील एका शासकीय रुग्णालयात एका तरुणाला सापाने चावा घेतल्यावर दाखल केले होते. ...