गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (17:54 IST)

2500 रुपये आणि सोन्याच्या बांगड्यासाठी नातवाने केला 90 वर्षांच्या आजीचा खून

murder
Lucknow Crime News उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका 90 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. शैल कुमारी या वृद्ध महिलेची हत्या कोणा बाहेरच्या व्यक्तीने नाही तर त्यांच्याच नातू मानसने केली होती. काही रुपयांच्या लालसेपोटी नातवाने आपल्याच आजीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, मानसचे वय 22 असून त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. दारू पिण्यासाठी पैसे मागण्यासाठी तो अनेकदा आजीकडे जात असे.
 
नातू 90 वर्षांच्या आजीचा 'खूनी' निघाला
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानस रविवारी त्याची 90 वर्षांची आजी शैल कुमारी यांच्याकडेही पैसे मागण्यासाठी गेला होता. आजीने मानसला पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा गळा चिरून खून केला. यानंतर आरोपी मानस याने आजीच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घरात ठेवलेले 2500 रुपये घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
 
पोलीस चौकशीत आरोपी मानसने गुन्ह्याची कबुली दिली
मानसने पोलिसांपासून वाचण्यासाठी नवीन सिमकार्ड घेतले होते. सुरुवातीला तो पोलिसांना चकमा देत राहिला मात्र पोलिसांनी मोबाईलच्या ईएमईआय नंबरच्या मदतीने त्याचा शोध घेतला. पोलिसांनी त्याला पकडले तरीही तो पोलिसांची दिशाभूल करत राहिला आणि त्याने आजीची हत्या केली नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी त्याच्या टी-शर्टवर रक्ताचे डाग दिसले आणि त्याची कसून चौकशी केली असता मानसने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.