गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (10:33 IST)

उड्डाणात दोन वर्षांच्या मुलीला हृदय विकाराचा झटका येऊन श्वास थांबला, वाचवण्याचा प्रयत्न विमानात सुरू

baby
डॉक्टर हे देवाचे दुसरे रूप आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. खरं तर, कर्नाटकातील बेंगळुरूहून राजधानी दिल्लीला येणाऱ्या विस्तारा एअरलाइनच्या विमानात बसलेल्या पाच डॉक्टरांनी एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचा जीव वाचवला, ज्याचा श्वास थांबला होता. या घटनेला दिल्ली एम्सने सोशल मीडियावर दुजोरा दिला आहे.  
 
UK-814 फ्लाइटमध्ये अचानक दोन वर्षांच्या मुलीची तब्येत बिघडली.मुलीला सायनोटिक आजार होता. तिच्यावर इंट्राकार्डियाकचे ऑपरेशन करण्यात आले. मुलीची तब्येत इतकी बिघडली की ती बेशुद्ध झाली. मुलीला असे पाहून विमानात उपस्थित असलेले लोक घाबरले. दरम्यान, विमानात उपस्थित असलेल्या दिल्ली एम्सच्या पाच डॉक्टरांनी देवाचे रूप घेऊन मुलीला वाचवले.
 
बाळाची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांना कळताच त्यांनी तातडीने तिची तपासणी केली. बाळाची नाडी गायब होती, हात-पाय थंड होते, श्वास घेत नव्हता. एवढेच नाही तर त्याचे ओठ आणि बोटेही पिवळी होती. त्यांना तातडीने सीपीआर देण्यात आला. यादरम्यान फ्लाइटमध्येच आयव्ही कॅन्युला देण्यात आली होती.
 
उपचारादरम्यान मुलीला हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांच्या पथकाने  AED वापरला. यावेळी डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे मुलीवर उपचार केले. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या सर्व साधनांचा वापर करून मुलीचे प्राण वाचले. 45 मिनिटे उपचार केल्यानंतर विमानाने चिमुकलीला नागपूरला पाठवण्यात आले आणि येथील बालरोग तज्ज्ञांकडे सोपवण्यात आले. मुलीची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.एम्सच्या पाच डॉक्टरांनी मुलीला वाचवले. 
 


Edited by - Priya Dixit