शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2017 (12:33 IST)

Kashmir : नौगाम नियंत्रण रेषेवर चकमक , ४ दहशतवादी ठार, ३ जवान शहीद

नौगाम नियंत्रण रेषेवरील भीषण चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, तर तीन जवानही हुतात्मा झाले. उत्तर काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये शनिवारी सुरू झालेली ही चकमक रविवारी संपुष्टात आली. काही दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. सतर्क सुरक्षा जवानांनी त्यांचा प्रयत्न उधळल्यानंतर ही चकमक उडाली होती.

चकमकीत  दोन दहशतवादी ठार झाले होते. तर दोन जवान हुतात्मा झाले होते.  आणखी दोन दहशतवादी मारले गेले तर एक जवान शहीद झाला. दोन दिवस चाललेल्या या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या मोहिमेत लष्कराच्या तीन जवानांना हौतात्म्य आले. नियंत्रण रेषेवर शोधमोहीम सुरू आहे. चकमकीच्या ठिकाणी चार शस्त्रे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.