गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 6 मे 2017 (11:47 IST)

नवी दिल्लीत वायूगळती झाल्याने 200 विद्यार्थिनींना बाधा

नवी दिल्ली येथील तुगलकाबाद परिसरात एका कंटेनर डिपोमध्ये वायूगळती झाल्याने 200 विद्यार्थिनींना बाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या वायूगळतीमुळे राणी झांसी सर्वोदय कन्या विद्यालयाच्या 200 विद्यार्थिनी अत्यावस्थ असल्याची माहिती उपप्राचार्या रेणु रामपाल यांनी दिली आहे. विद्यार्थिंनींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. रेणू रामपाल यांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी साडेसात वाजता विद्यार्थिनीं डोळ्यात जळजळ आणि गळ्यात मळमळ होत असल्याची तक्रार केली.