अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला! जमावाने वाहनावर दगडफेक केली
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निवडणुकीपूर्व हल्ला झाला आहे. त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच त्यांना जमावाने काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. आप पक्षाने या घटनेचा व्हिडिओ जारी केला आहे. त्यात केजरीवाल यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आल्याचे म्हटले आहे.
आप पक्षाने x वर पोस्ट शेअर केली असून परभवाच्या भीतीने भाजप पक्ष नर्व्हस झाल्याचे बोलले जात आहे. केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी भाजप पक्षाचे गुंड आले आणि त्यांनी केजरीवाल यांच्यावर प्रचार करत असताना वीटा आणि दगडफेक करून त्यांना इजा देण्याचा प्रयत्न केला जेणे करून ते प्रचार करू नये.असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
या वर प्रत्युत्तर देत भाजपने आप पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा म्हणाले, केजरीवाल यांच्या वाहनाने आमच्या कार्यकर्त्यांना पायदळी तुड़वले आहे.आमच्या एका कार्यकर्त्याच्या पायाला इजा झाली आहे. मी त्यांना बघण्यासाठी लेडी होर्डिंग जात आहे.
गेल्या 11 वर्षांपासून दिल्ली मध्ये चालणाऱ्या केजरीवाल सरकारने दिल्लीत भ्रष्टाचार पसरवले आहे. मी देशवासियांना आणि दिल्लीच्या जनतेला आवाहन करतो की तुम्हाला दिल्ली वाचवायची आहे.
Edited By - Priya Dixit