1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 जून 2023 (22:53 IST)

चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर हल्ला, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

chandrashekhar azad
ANI
उत्तर प्रदेशातल्या सहारनपुरमध्ये आझाद समाज पार्टी-काशीरामचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे.
 
कारमधून आलेल्या काही बंदुकधारी लोकांनी चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर गोळ्या चालवल्याची माहिती सहारणपुरचे एसएसपी डॉ. विपिन टाडा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.
 
एक गोळी चंद्रशेखर यांच्या शरीराला घासून गेली. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे असंही एसएसपींनी सांगितलं.
 
पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
 
बीबीसी प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांना चंद्रशेखर यांच्या सहकाऱ्याने त्यांना गोळी लागल्याच्या आणि रुग्णालयात भरती केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये गोळी त्यांच्या कमरेला लागून गेल्याचं दिसत आहे. ते शुद्धीवर होते.