मंगळवार, 10 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (10:54 IST)

हिजाब असो किंवा बिकिनी आणि जीन्स असो, महिलांना त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार: प्रियांका गांधी

कर्नाटकातील हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे. महिलांना त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे, मग ते बिकिनी असो, बुरखा असो किंवा जीन्स असो, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या की महिलांचा छळ थांबवा.
 
प्रियांका ट्विट करून काय म्हणाली?
प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, “मग ते बिकिनी असो, बुरखा असो, जीन्स असो किंवा हिजाब असो. तिला काय घालायचे आहे हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीचा आहे. भारतीय संविधानाने हा अधिकार महिलांना दिला आहे. महिलांचा छळ करणे थांबवा.