1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 20 एप्रिल 2024 (11:04 IST)

एअर इंडियाचा मोठा निर्णय, रद्द केलीत दुबई आणि तेल अवीवचे उड्डाणे

Air Indai
Air India Cancels Flights To Dubai And Tel Aviv : विमान कंपनी एअर इंडियाने पश्चिम आशियामध्ये सुरु असलेल्या तणावमुळे इस्राईलची राजधानी तेल अवीवसाठी येणारी जाणारी विमान सेवा 30 एप्रिल पर्यंत रद्द केली आहेत. ऐरलाईन नवी दिल्ली आणि तेल अवीव मध्ये असणारी चार आठ्वड्यामधून उड्डाणे संचालित करते. सोबतच दुबईमध्ये झालेला पाऊस आणि ओला दुष्काळामुळे विमान तळावर देखील पाणी भरल्यामुळे एअर इंडियाने तिथे येणारी जाणारी विमाने रद्द केली आहे. 
 
एअर इंडियाच्या एका अधिकारीने सांगितले की, पश्चिम आशियामधील तणावपूर्ण स्थिती पाहून तेल अवीव ते एअर इंडियाची सर्व उड्डाणे 30 एप्रिल पर्यंत बंद राहतील. आमचे परिस्थितीवर लक्ष आहे. एयरलाईन अश्या यात्रींनसाठी व्यवस्था करणार असून रद्द झालेल्या तिकिटमध्ये सूट देणार आहे ज्यांनी या दरम्यान तेल अवीवला जाण्यासाठी बुकिंग केले आहे. 
 
एअर इंडियाने रविवारी तेल अवीवसाठी आपली उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्राईलवर इराणचे हल्ल्यामुळे पश्चिम आशियामध्ये तणाव वाढला आहे. टाटा समूहाच्या कंपनीने पाच महिन्यानंतर तीन मार्चला तेल अवीवसाठी विमान सेवा सुरु केली होती. एअर इंडियाने तेल अवीव वर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर 7 आक्टोंबर 2023 ला विमान सेवा रद्द केली होती. 
 
दुबई मध्ये झालेल्या अवकाळी पाऊसामुळे एअर इंडियाने तिथून येणारी जाणारी विमान सेवा सध्या रद्द केली आहे. एअर इंडियाने शुक्रवारी सांगितले की, ज्या पॅसेंजरची दुबईसाठी 21 एप्रिल पर्यंत बुकिंग आहे, त्यांचे बुकिंग रद्द करण्यात आली असून त्यांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत मिळतील असे सांगितले आहे. सध्यातरी एअर इंडिया भारतातील पाच शहरांमधून दुबईसाठी प्रत्येक आठवड्यात 72 उड्डाणे होतात. ज्यामध्ये 32 उड्डाणे दिल्लीमधून होतात. 

Edited By- Dhanashri Naik