1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 5 जून 2022 (17:23 IST)

मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या भाजप नेत्या नुपूर शर्मां आणि नवीन जिंदाल यांचे पक्षातून निलंबन

kamal 600
इस्लामबद्दल आणि मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजप नेते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. दोघांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे. नुपूर शर्माने एका टीव्ही चर्चेदरम्यान मोहम्मद  पैगंबरांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. दिल्ली भाजपचे मीडिया प्रभारी नवीन जिंदाल यांच्यावरही पक्षाने कारवाई केली आहे. 
 
 यापूर्वी, पक्षाने एक निवेदन जारी केले होते की, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणाऱ्या अशा विधानांचे समर्थन करत नाही. पक्षाने आपल्या निवेदनात नुपूर शर्माचा थेट उल्लेख केलेला नाही. काही वेळाने पक्षाने नुपूर यांना निलंबित करण्याचा फॉर्मही जारी केला. त्याचवेळी नवीन जिंदाल यांच्याबद्दल असे म्हटले जात होते की, भाजप दिल्लीचे प्रवक्ते नवीन कुमार जिंदाल यांनी अल्पसंख्याक समाजासंदर्भात ट्वीट करून वादात भर घातली. या ट्वीटवरही जोरदार टीका झाली. जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याप्रकरणी जिंदाल यांनी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.त्यामुळे त्यांची तत्काळ प्रभावाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.