शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (14:27 IST)

पुस्तक विक्रेत्याला महिलांकडून मारहाण

Bookseller beaten up by women मध्य प्रदेशातील (MP Crime) उज्जैन (Ujjain National Book Fair) येथील राष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलांनी पुस्तक विकणाऱ्याला मारहाण करत धक्काबुक्की केली आहे. दुकानदार महिलांचे फोन नंबर घेऊन मुस्लिम धर्माचा प्रचार करत असल्याचा आरोप महिलांनी केला होता. व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी (MP Police) दुकानदाराविरुद्ध विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
 
मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये 1 सप्टेंबरपासून हा ग्रंथ मेळा सुरू आहे. पंजाबचा रहिवासी राजा वकार सलीम याने जत्रेत पुस्तकांचा स्टॉल लावला आहे. तो 14 क्रमांकाच्या दुकानात ‘अहमदिया मुस्लिम कम्युनिटी’ या नावाने पुस्तकांची विक्री करतो होता. 3 सप्टेंबर रोजी हा सगळा प्रकार घडला. राजा वकार सलीम याने काही महिलांना त्यांचा मोबाईल क्रमांक मागितला तेव्हा हा सगळा वाद सुरू झाला. याच कारणावरुन महिलांनी राजा वकार सलीमला मारहाण केली. विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षा रितू कपूर यादेखील तिथे उपस्थित होत्यावकार सलीम पुरुषांना व्हिजिटिंग कार्ड देत होता आणि महिलांना पुस्तके पाठवण्याच्या बहाण्याने त्यांचा फोन नंबर रजिस्टरमध्ये लिहून घेत होता. त्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली," असा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षा रितू कपूर यांनी केला.