रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (15:23 IST)

निक्की यादवचा शेवटचा CCTV व्हिडिओ समोर आला, हत्येच्या काही तास आधी कॅमेरात कैद झाला होता

हरियाणातील रहिवासी असलेल्या निक्की यादवच्या हत्येपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हा व्हिडीओ निकीची हत्या होण्याच्या काही तास आधीचा आहे. व्हिडिओमध्ये निक्की दक्षिण पश्चिम दिल्लीतील तिच्या भाड्याच्या घरात जाताना दिसत आहे. निक्की यादवचा तिचा प्रियकर साहिल गेहलौत याने मोबाईल चार्जिंग केबलने गळा दाबून खून केला होता.
 
हत्येनंतर मृतदेह लपवून ठेवला
हत्येनंतर निकीचा प्रियकर साहिलने तिचा मृतदेह मित्राव गावाजवळील त्याच्या ढाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला. मंगळवारी ढाब्याच्या फ्रीजमधून निकीचा मृतदेह सापडला. त्यानंतर बुधवारी राव तुलाराम मेमोरियल हॉस्पिटलमधून दीनदयाळ उपाध्याय हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टममध्ये निक्कीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
शरीरावर जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत
तिच्या मानेवर जखमेच्या खुणा होत्या आणि शरीरावर इतर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रेफ्रिजरेटरमध्ये मृतदेह असल्याने मृत्यूची नेमकी वेळ सांगणे कठीण आहे, कारण रेफ्रिजरेटरमध्ये कोणतीही नैसर्गिक प्रक्रिया होत नाही. व्हिसेरा रिपोर्ट जतन करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी पुढे सांगितले की, दिल्ली पोलीस श्रद्धा खून प्रकरणाच्या धर्तीवर तपास करणार आहेत. फॉरेन्सिक तपासणीच्या आधारे पुरावे गोळा केले जात आहेत.