सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 8 जुलै 2023 (12:55 IST)

'चंद्रयान 3' लॉन्च होण्याचा दिवस अगदी जवळ, मोहिमीची पूर्ण माहिती सोबत प्रत्यक्ष कसे बघणार याची पूर्ण माहिती

Chandrayaan 3
Chandrayaan 3
Chandrayaan 3 launch day is very close भारताचे बहुप्रतीक्षित 'चंद्रयान 3' लॉन्च होण्याचा दिवस अगदी जवळ आला आहे. इस्रोने गुरुवारी जाहीर केल्यानुसार, 'चंद्रयान-3' 14 जुलैला लॉन्च होईल. चंद्रयान-3 घेऊन जाणारे इस्रोचे रॉकेट श्री हरिकोटाच्या लॉन्चपॅडवर नेण्यात येत आहे. याचा एक व्हडिओही समोर आला आहे.
 
चांद्रयान-३ मोहिमेची उलटी गिनती सुरू झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने त्याच्या प्रक्षेपणाची तारीख दिली आहे. 14 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून हे प्रक्षेपण केले जाईल असे अंतराळ संस्थेने म्हटले आहे. त्याचे प्रक्षेपण दुपारी 2.35 वाजता होईल. इस्रोने काल एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी सांगितले की, चांद्रयान-3 अंतराळयान त्यांच्या नवीन प्रक्षेपण रॉकेट LVM-3 शी जोडले गेले आहे.
 
इस्रोने गुरुवारी ट्विट करून संपूर्ण वेळापत्रकाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की चांद्रयान-3 मिशन 13 जुलै रोजी प्रक्षेपित केले जाईल. दुपारी 2.35 वाजता सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण केले जाईल.
 
चांद्रयान-3 मोहीम
इस्रोनेही बुधवारी ट्विट केले. त्यात त्यांनी सांगितले होते- 'आज, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथे चंद्रयान-3 ला एलव्हीएम-3 (लाँच व्हेईकल मार्क-३) शी जोडण्यात आले.'
 
चांद्रयान-3 मोहिमेमध्ये चंद्राच्या कवचाची थर्मोफिजिकल वैशिष्ट्ये, चंद्राच्या भूकंपांची वारंवारता, चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा वातावरण आणि लँडिंग साइटजवळील घटकांची रचना यांचा अभ्यास करण्यासाठी उपकरणे असतील.
 
इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडर आणि रोव्हरवर बसवण्यात आलेली ही वैज्ञानिक उपकरणे 'सायन्स ऑफ द मून' या थीमखाली ठेवण्यात येणार आहेत. तर प्रायोगिक उपकरणे चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचा अभ्यास करतील, ज्याला 'चंद्रापासून विज्ञान' या थीमखाली ठेवण्यात येणार आहे.
 
या वर्षी मार्चमध्ये, चांद्रयान-3 अंतराळ यानाने त्याच्या आवश्यक तपासण्या पूर्ण केल्या होत्या. प्रक्षेपणाच्या वेळी आलेल्या कठीण परिस्थितीच्या कसोटीवर उतरले आहे. लँडर चंद्रावरील विशिष्ट जागेवर सॉफ्ट-लँड करण्याच्या क्षमतेसह सुसज्ज असेल आणि रोव्हर तैनात करेल, जे चंद्राच्या पृष्ठभागावर रासायनिक विश्लेषण करेल.
 
'चंद्रयान 3' लॉन्च होण्याचा दिवस अगदी जवळ , मोहिमीची पूर्ण माहिती सोबत प्रत्यक्ष कसे बघणार याची पूर्ण माहिती
भारताचे बहुप्रतीक्षित 'चंद्रयान 3' लॉन्च होण्याचा दिवस अगदी जवळ आला आहे. इस्रोने गुरुवारी जाहीर केल्यानुसार, 'चंद्रयान-3' 14 जुलैला लॉन्च होईल. चंद्रयान-3 घेऊन जाणारे इस्रोचे रॉकेट श्री हरिकोटाच्या लॉन्चपॅडवर नेण्यात येत आहे. याचा एक व्हडिओही समोर आला आहे.
चांद्रयान-३ मोहिमेची उलटी गिनती सुरू झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने त्याच्या प्रक्षेपणाची तारीख दिली आहे. 14 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून हे प्रक्षेपण केले जाईल असे अंतराळ संस्थेने म्हटले आहे. त्याचे प्रक्षेपण दुपारी 2.35 वाजता होईल. इस्रोने काल एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी सांगितले की, चांद्रयान-3 अंतराळयान त्यांच्या नवीन प्रक्षेपण रॉकेट LVM-3 शी जोडले गेले आहे.
 
इस्रोने गुरुवारी ट्विट करून संपूर्ण वेळापत्रकाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की चांद्रयान-3 मिशन 13 जुलै रोजी प्रक्षेपित केले जाईल. दुपारी 2.35 वाजता सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण केले जाईल.
 
चांद्रयान-3 मोहीम
इस्रोनेही बुधवारी ट्विट केले. त्यात त्यांनी सांगितले होते- 'आज, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथे चंद्रयान-३ ला एलव्हीएम-३ (लाँच व्हेईकल मार्क-३) शी जोडण्यात आले.'
 
चांद्रयान-3 मोहिमेमध्ये चंद्राच्या कवचाची थर्मोफिजिकल वैशिष्ट्ये, चंद्राच्या भूकंपांची वारंवारता, चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा वातावरण आणि लँडिंग साइटजवळील घटकांची रचना यांचा अभ्यास करण्यासाठी उपकरणे असतील.
 
इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडर आणि रोव्हरवर बसवण्यात आलेली ही वैज्ञानिक उपकरणे 'सायन्स ऑफ द मून' या थीमखाली ठेवण्यात येणार आहेत. तर प्रायोगिक उपकरणे चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचा अभ्यास करतील, ज्याला 'चंद्रापासून विज्ञान' या थीमखाली ठेवण्यात येणार आहे.
 
या वर्षी मार्चमध्ये, चांद्रयान-3 अंतराळ यानाने त्याच्या आवश्यक तपासण्या पूर्ण केल्या होत्या. प्रक्षेपणाच्या वेळी आलेल्या कठीण परिस्थितीच्या कसोटीवर उतरले आहे. लँडर चंद्रावरील विशिष्ट जागेवर सॉफ्ट-लँड करण्याच्या क्षमतेसह सुसज्ज असेल आणि रोव्हर तैनात करेल, जे चंद्राच्या पृष्ठभागावर रासायनिक विश्लेषण करेल.
 
चंद्रयान-3 चे प्रक्षेपण पाहता यावे यासाठी
अनेक लोकांना हे लॉन्च डोळ्याने समोरा समोर पाहण्याची इच्छा आहे. सर्वासामान्य नगरिकांना चंद्रयान-3 चे प्रक्षेपण पाहता यावे यासाठी इस्रोच्या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन विंडो देण्यात आली आहे.
 
या वेबसाइटच्या माध्यमाने केले जाऊ शकते रजिस्ट्रेशन -
lvg.shar.gov.in या वेबसाइटवर जाऊन देथे देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून सोप्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते. वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटमध्ये इस्रो स्पेस थीम पार्क विकसित करत आहे. या स्पेस थीम पार्कमध्ये रॉकेट गार्डन, लॉन्च व्ह्यू गॅलरी आणि स्पेस म्यूझिअमचा समावेश असेल. सध्या लोकांसाठी लॉन्च व्ह्यू गॅलरी आणि स्पेस म्यूझिअम खुले झाले आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor