शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (17:45 IST)

केमिकल फॅक्टरीचा बॉयलर फुटला,भीषण अपघात,10 कामगारांचा मृत्यू

यूपीच्या हापूरमध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. बॉयलरचा स्फोट झाल्याने केमिकल फॅक्टरीत मोठा आवाज होऊन आग लागली. जोरात स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाळा पाहून लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या अपघातात 10 मजूर जिवंत जाळले आहेत. तर 15 जण गंभीररीत्या भाजले आहेत.अपघाताची माहिती मिळताच पोलीस-प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. कारखान्यातही मदतकार्य सुरू आहे.
 
जिल्ह्यातील धौलाना भागात एक यूपीआयडी कारखाना आहे, ज्यामध्ये केमिकल बनवले जाते. शनिवारी दुपारी अचानक कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोठा आवाज करत बॉयलर फुटल्याने आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाळा पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. अपघातावेळी कारखान्यात सुमारे 25 कामगार काम करत होते. या अपघातात 10 मजूर जिवंत जळाले, तर 15 मजूर गंभीररीत्या भाजले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.