शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (17:16 IST)

ख्रिश्चन धर्मगुरु फादर टॉम यांची सुटका

इसिसच्या तावडीतून अखेर ख्रिश्चन धर्मगुरु फादर टॉम यांची सुटका झाली आहे. फादर टॉम भारतीय नागरीक आहेत.  वर्षभरापूर्वी 2016 मध्ये येमेनच्या दक्षिणेकडील अदेन शहरातून इसिसने  त्यांचे अपहरण केले होते. फादर टॉम यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु होते. जवळपास 18 महिने फादर टॉम इसिसच्या तावडीत होते. 

मार्च 2016 मध्ये चार बंदुकधारी दहशतवाद्यांनी सेवा केंद्रावर हल्ला करुन फादर टॉम यांचे अपहरण केले होते. काही महिन्यांपूर्वी फादर टॉम यांचा एक व्हिडीओ येमेनी वेबसाईटने प्रसिद्ध केला होता. दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सुद्धा टॉम यांच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.