गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :नवी दिल्ली , बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (14:03 IST)

निवार वादळाचा परिणाम, चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस, जोरदार वार्यामुळे झाडे कोसळली

देशासमोर कोरोनाचे संकट उभे असतानाच आणखीही काही संकटे उभी ठाकली आहेत. त्यापैकीच एक संकट आहे चक्रीवादळाचे.
 
तामिळनाडूमध्ये निवार या चक्रीवादळासंदर्भात सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी सर्व किनारी भागांमध्ये एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार  बुधवारी कराईकल आणि मल्लापुरम या भागांवर धडकू शकते. ज्या पार्श्वाभूमीवर ताशी 100 ते 110 कि.मी. वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. संबंधित भागांमध्ये तैनात असणार्या0 पथकांनी सर्व जबाबदारीची पावले उचलण्यास सुरुवात केल्याची माहिती काही अधिकार्यां नी दिली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये चेन्नईच्या किनारपट्टी भागात अनेक चक्रीवादळे धडकली आहेत. त्यामुळे त्याच धर्तीवर येणार्याग निवार चक्रीवादळासाठीही आपण सर्वतोपरी तयारी करत असल्याचेही ते म्हणाले.
 
पुढील चोवीस तास सावधगिरीचे...
बंगालच्या खाडी क्षेत्रावर तयार होणार्याल कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर हे निवारमध्ये परिवर्तित झालेले आहे. इतकंच नव्हे, तर आता ते भयावह स्वरूपही धारण करण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार हे वादळ बुधवारी तामिळनाडू, पुदुच्चेरीच्या किनार्यां वर धडकणार आहे. परिणामी पुढील चोवीस तासांचा कालावधी हा अधिक सावधगिरीचा असेल. बंगालच्या खाडी भागात तयार झालेले हे वादळ तामिळनाडूच्या दिशेने येत असून सध्या ते पुदुच्चेरीपासून 410 कि.मी. दक्षिणेकडे आहे.
 
मुसळधार पावसाला सुरुवात ...
वादळाची एकंदर वाटचाल पाहता या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ज्यामुळं चेम्बरमबक्कम आणि अशा अनेक जलाशयांवर प्रशासनांकडून नजर ठेवण्यात येत आहे. शिवाय सावधगिरी म्हणून सखल भागांमध्ये राहणार्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं जात आहे. मासेमारांनाही समुद्रात नाव न नेण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.