मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जून 2017 (11:24 IST)

पुढच्या महिन्यापासून मुंबई ते दिल्ली अंतर १२ तासांवर

पुढच्या  महिन्यापासून भारतीय रेल्वेचा वेग वाढणार आहे. त्यामुळे मुंबई ते दिल्ली हे अंतर १७ तासांवरुन १२ तासांवर येणार आहे. राजधानी एक्स्प्रेसचा वेग ३० टक्क्यांनी वाढणार असल्याने मुंबई-दिल्ली दरम्यान प्रवास करताना प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. मुंबई-दिल्ली प्रवासासोबतच दिल्ली-हावडा प्रवासासाठी लागणारा वेळदेखील १७ तासांवरुन १२ तासांवर येणार आहे. मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-हावडा या दोन्ही मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग वाढवून ताशी २०० किलोमीटर इतका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे हे दोन्ही रेल्वे मार्ग देशातील सर्वाधिक वेगवान रेल्वे मार्ग होणार आहेत. सध्या दिल्ली ते आग्रा दरम्यान धावणारी गतिमान एक्स्प्रेस ताशी १६० किलोमीटर वेगाने धावते. भारतीय रेल्वे गाड्यांचा सरासरी वेग १०० किलोमीटर प्रति तास इतका आहे. ‘राजधानी एक्स्प्रेसचा वेग ७५ किलोमीटर प्रतितास इचका आहे. तर इतर लांब पल्ल्यांच्या गाड्या साधारणत: ५२ किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. देशाती मालगाड्यांचा वेग सरासरी २२ किलोमीटर प्रतितास आहे,’ अशी माहिती रेल्वेतील एका अधिकाऱ्याने दिली.