शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जिथे शौचालय नाही तिथे मुलगी देणार नाही

धमतरी- देशभरात शौचालयाच्या अभावामुळे नवर्‍या मुली सासर सोडून परत येत असल्याच्या बातमी हल्ली सामान्य झाल्या आहेत. या दरम्यानच छत्तिसगढाच्या धमतरी समाजाने अश्या प्रकरणांत आधीपासून सावध राहण्याचा निर्णय घेतला आहे.
धमतरीच्या निषाद समाजाने सर्वसहमतीने निर्णय घेतला आहे की ज्या घरात शौचालय नसेल, तिथे समाजातील कोणताही व्यक्ती आपल्या मुलीचं लग्न करवणार नाही. समाजाचे अध्यक्ष लीलाराम निषाद यांनी सांगितले की बैठकीत सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करताना हा प्रस्ताव आला की योग्य मुलाच्या घरी शौचालय नसल्यास मुलीकडील पक्ष त्या घरात आपल्या मुलीचा विवाह करणार नाही.
 
प्रस्ताव आल्यावर लोकांनी टाळ्या वाजवून आपली समर्थन दिले. या समाजाने मागल्या वर्षी निर्णय घेतला होता की समाजाद्वारे प्रत्येक घरात एक झाड रोपण्यात येईल. याचे चांगले परिणाम समोर आले होते.