मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 22 मार्च 2023 (10:45 IST)

Earthquake: भारतात भूकंपाच्या धक्क्यांनी 80 सेकंद पृथ्वी हादरली

रात्री भूकंपाच्या धक्क्यांनी अर्धा भारतच हादरला नाही तर चीन, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही हे धक्के जाणवले. भारतातील या धक्क्यांमुळे सुमारे 80 सेकंद पृथ्वी हादरली आणि रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.6 होती. दिल्ली-एनसीआरशिवाय लखनऊमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, नोएडा- ग्रेटर नोएडासह गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
 
हिमाचल प्रदेशातील शिमला, कुल्लू, चंबा, डलहौसी, मंडी, सोलनसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, बिहारमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानपासून 90 किमी अंतरावर असलेल्या कलाफगनमध्ये होता. तुर्कमेनिस्तान, भारत, कझाकिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीतील शकरपूरमध्ये इमारत वाक्ल्याची बातमी आहे. 

सुदैवाने कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या अहवालानुसार, अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून 133 किमी आग्नेय दिशेला 6.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू 156 किमी खोलीवर होता.
 
Edited By - Priya Dixit