मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (23:52 IST)

ED Summons Sonia Gandhi : ईडीने सोनिया गांधींना पुन्हा समन्स बजावले, त्यांना 21 जुलैला हजर राहण्यास सांगितले

rahul sonia gandhi
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा समन्स बजावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोनिया गांधी यांना 21 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी सोनिया गांधी यांनी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मागितली होती.
 
कोरोनाशी लढा देत असलेल्या सोनिया गांधी यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे, त्यामुळे त्या काही आठवडे ईडीसमोर हजर राहू शकणार नाहीत, असे सांगण्यात आले. ईडीनेही त्यांची विनंती मान्य केली होती. ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना जुलैच्या अखेरीस कधीही चौकशी एजन्सीसमोर हजर राहून मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांचे म्हणणे नोंदवण्यास सांगितले होते.
 
गांधी यांची पाच दिवसांत सुमारे 50 तास चौकशी करण्यात आली आहे. यादरम्यान त्यांचे जबाब मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) नोंदवण्यात आले.