शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बेळगाव , सोमवार, 21 जून 2021 (08:04 IST)

‘फादर्स डे’च्या दिवशी पित्याची दोन तरुण मुलींसह आत्महत्या

बेळगावात खळबळजनक एक घटना घडली आहे. फादर्स डे दिवशीच एका पित्याने आपल्या दोन तरुण मुलींसह आत्महत्या केल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील (Belgaum Latest Update) चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टी गावात  घडली आहे.
 
फादर्स डे दिवशी पित्याने आपल्या दोन तरुण मुलींसह आत्महत्या Suicide केल्याच्या घटनेमुळे पोगत्यानट्टी गावातील लोक देखील हादरून गेले आहेत. आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव काडप्पा रंगापुरे (वय ४२) असे असून मुलींची नावे कीर्ती (वय २०) व स्फूर्ती (वय १८) अशी नावे आहेत. या तिघांनीही घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
 
काडप्पा यांची पत्नी चन्नव्वा रंगापुरे (वय ४०) यांचे एक आठवड्या अगोदरच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. 
 
पत्नीच्या निधनाचा धक्का काडप्पा सहन करू शकला नाही. पत्नीच्या मृत्यूनंतर तो पुढे आपल्या कुटुंबाचे कसे होणार याची काळजी त्यांना लागून राहिली होती. Suicide of father and daughter यामुळे काडप्पा यांनी आपल्या राहत्या घरीच दोन्ही तरुण मुलींसोबतच गळफास घेवून आत्महत्या करून आपले जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येची घटना मिळताच तातडीने चिकोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे. चिकोडी पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.